कथा सॅमसंगची (Samsung) एक वाण्याचे दुकान ते एक बलाढ्य कंपनी.

कथा सॅमसंगची (Samsung) एक वाण्याचे दुकान ते एक बलाढ्य कंपनी.

 1. 1938 साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षिण कोरियामध्ये ‘सॅमसंग’ या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.
 2. 1940 साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून नूडल्स बनवण्याच्या व विक्रीच्या व्यवसायाला सुरवात केली.
 3. 1950 साली सॅमसंगने नूडल्सचे उत्पादन बंद करून साखरेचे उत्पादन करायला सुरवात केली.
 4. 1954 साली सॅमसंगने साखरेचे उत्पादन बंद केले व गरम कपडे बनवण्यासाठी वूलन मिल सुरू केली.
 5. 1956 साली सॅमसंगने वूलन मिल बंद करून इन्शुरन्स व सिक्युरिटीज विकायच्या व्यवसायाला सुरवात केली.
 6. 1960 साली सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात प्रवेश केला व ‘ब्लॅक ऍन्ड व्हाईट’ टेलिव्हिजन सेट्स बनवायला सुरवात केली.
 7. 1980 साली सॅमसंगने टेलिकॉमच्या क्षेत्रात प्रवेश केला व व टेलिफोन स्विच बोर्ड बनवायला सुरवात केली.
 8. 1987 साली सॅमसंग कंपनीचा संस्थापक ली याचा मृत्यु झाला. त्यामूळे कंपनीचे विभाजन चार वेगवेगळ्या व स्वतंत्र कंपन्यांमध्ये झाले. डिपार्टमेन्टल स्टोअर्स, केमिकल्स व लॉजिस्टिक्स, पेपर व टेलिकॉम व इलेक्ट्रॉनिक्स असे विभाजन झाले.
 9. त्याच साली सॅमसंगने जागतिक स्तरावर सेमिकंडक्टर प्लॅन्ट्समध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली.
 10. 1990 साली सॅमसंगने जागतिक स्तरावरची गुंतवणूक बंद करून रिअल इस्टेच्या क्षेत्रात प्रवेश केला. मलेशियामधले पेट्रॉनास टॉवर्स तसेच तैवानमधील तैपेई 101 या जगातील सर्वात उंच इमारतींचे बांधकाम सॅमसंगने केले.
 11. 1993 साली मोठी मंदी आली. आशियन मार्केटमध्ये मोठी मंदी होती. सॅमसंगला पण याचा मोठा फटका बसला. त्यावेळी लीच्या मुलाने कंपनीचा सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली होती. त्याने कंपनीचे डाऊनसायझींग करायला, कंपनीच्या उप कंपन्या म्हणजेच सबसिडिअरीज विकायला व उरलेल्या कंपन्यांचे एकत्रीकरण करायला सुरवात केली.
 12. इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनिअरींग व केमिकल डिव्हीजन्सचे एकत्रीकरण केल्यामुळे सॅमसंग ही जगातील मेमरी चिप्सचे उत्पादन करणारी सर्वात मोठी कंपनी बनली.
 13. 1995 साली सॅमसंगने ‘लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले’ च्या क्षेत्रात प्रवेश केला व केवळ 10 वर्षातच ‘फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन’ बनवणारी जगातील सगळ्यात मोठी कंपनी बनली.
 14. 2010 साली लिक्विड क्रिस्टल डिसप्लेच्या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाल्याने सॅमसंग कंपनीने पुढील 10 वर्षांच्या वाटचालीचे धोरण ठरवले व स्मार्टफोनच्या क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले.
 15. 2016 सालामध्ये सॅमसंग ही मोबाइल फोन व स्मार्टफोन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज सॅमसंगच्या स्मार्टफोनची विक्री आय फोनच्या विक्रीच्या दुपटीहून अधिक आहे.
आज सॅमसंगची विक्री 250 बिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे व दक्षिण कोरियाच्या एकूण एक्सपोर्टमध्ये सॅमसंगचा वाटा एक पंचमांश ईतका आहे.
किराणा मालाचे दुकान – नूडल्सचे उप्पादन – साखरेचे उत्पादन- वूलन मिल – इन्शुरन्स व सिक्युरिटिजची विक्री – टेलिव्हिजन सेट्सचे उत्पादन जाग- टेलिफोन स्विच बोर्डचे उत्पादन – सेमिकंडक्टर प्लॅन्टमध्ये जाग जागतिक स्तरावर गुंतवणूक- रिअल इस्टेट – मेमरी चिप्स – फ्लॅट स्क्रीन टेलिव्हिजन – मोबाइल फोन व स्मार्ट फोन असा सॅमसंगचा प्रवास आहे.
एक वाण्याचे दुकान ते जगातील सर्वात बलाढ्य कंपन्यांपैकी एक असा सॅमसंगचा प्रवास थक्क करणारा आहे.
तात्पर्यः-
बदल हा जसा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे तसाच तो बिझनेस, इंडस्ट्री व उद्योग व्यवसायाचा पण अविभाज्य भाग आहे.
त्यामुळे बदल करायला घाबरू नका. तुम्ही जर बदल स्वीकारला नाही तर तुम्ही नगण्य व्हाल! त्याच त्याच गोष्टी परत परत करण्याच्या मानसिकतेमध्ये अडकून पडू नका. त्यामुळे बोअर व्हाल.
अयशस्वी होत असताना सुद्धा काही बिझनेस चालतच असतात ते एकप्रकारच्या आंतरिक ऊर्जेमुळे.
या अपयशातूनच या कंपन्या प्रगती साधत असतात ते कशामूळे?
कारण बिझनेसमधले अपयश हे तुम्ही प्रयत्न करता आहात याचे प्रतिक असते.
ते नव्या पद्धतीने कंपन्यांची पुन्हा रचना करत असतात. नवी क्षेत्रे शोधून काढून त्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असतात. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत असतात.
नवीन पाण्यात शिरायचा प्रयत्न करीत असतात.
आता सॅमसंगचेच पहा. त्यांनी कित्येक असे बिझनेस केले की त्यांचा परस्पराशी काही संबंध नाही. पण परिस्थितीनुसार ते बदलत गेले.
नवीन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रवेश करत गेले व नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करत गेले.
स्वतःच्या कंपन्यांचा नव्याने शोध घेत नवीन कल्चर आत्मसात करत गेले.
यशाचा कोणताही परफेक्ट फॉर्म्युला नाही.
त्यामुळे सतत प्रयत्न करत रहा. योग्य वेळी बदल करत रहा.
केव्हा ना केव्हातरी तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल याची खात्री बाळगा.
आपला बिझनेस किंवा उद्योग व्यवसाय यशस्वी करा!
आयुष्यात यश मिळवा!
20

Sharing

About The Author: Shriram Garde

My mission is just to share the events in my life sincerely with you; as I have experienced them, not necessarily in that order. I write on various topics. Whether that means - advice, tips, tools, scriptures, or instructions on budgeting, getting out of debt, making some extra cash, investing or anything else, I intend to provide it. I was 18 years old when I started working as a labourer. I had no savings. I had no money left in my bank accounts. I know life through lot of unpleasant incidences occurring day in and day out. But what I realised is that it doesn't have to be always like that. We are not doomed to how we are currently living – we all can change! I know, because over last couple of years my family and me have paid off a huge amount of debt. I have a passion to help people come to this realisation and get started on their own journey to financial freedom. I had owned 2 Companies before moving to Finance Sector about 9 years back. Spending more than 30 years in various capacities taught me quite a lot. I have a diploma in Engineering completed in part time while I was working. I have learned a good chunk from my working background in various fields. But, like most people who are eager to learn, the bulk of what I have learned thus far is from reading magazines, books, blogs, pod cast or whatever else I can get my hands on about Personal Finance, investing, business, personal development, and time management.

Leave your comment