माझ्या (समवयस्क) मित्र मैत्रिणींसाठी

माझ्या (समवयस्क) मित्र मैत्रिणींसाठी

माझ्या (समवयस्क) मित्र मैत्रिणींसाठी :

मी लहान असताना षष्ठ पूर्ती सोहळ्याला गेलो की  मला एक विचार नेहमी भेडसावायचा ! उत्सवमूर्ती वरून खूप आनंदी आणि खुश दिसतो आहे पण खरोखर हे गृहस्थ आनंदी असतील की आता आपले आयुष्य संपत आले म्हणून विवंचनेत असतील?

आज ह्या व्यक्तीच्या मनात नक्की विचारांचे कशा प्रकारचे द्वंद्व चालू असेल? मी कित्तेकदा अशा व्यक्तींना त्याबाबत विचारले पण कोणीच समाधान होईल असे उत्तर देऊ शकला नाही.

म्हणता म्हणता आपली सर्वांची साठी येऊन ठेपली (आमची पन्नाशी) किंवा आपल्यातल्या काहींनी नुकतीच साठी ओलांडली असणार, आणि त्यामुळे जीवनाच्या पुढील प्रवासाची तुम्ही सर्वच जण आखणी करण्याच्या मनस्थितीत असणार.

माझ्या लक्षात आले की षष्टपूर्तीला मनुष्य पूर्णतः गोंधळलेल्या मनस्थितीत असतो. आयुष्यात स्थिरस्थावर आणि आर्थिक सुस्थितीत जरी असला तरी त्याला त्याच्या भविष्यकाळाची चिंता भेडसावत असते.

त्याच्या आप्तेष्टांचा, कुटुंबाचा, मित्रांचा आणि ज्यांची ज्यांची त्याला आयुष्याची शिडी चढताना मदत झाली आणि जे अजून ह्यात आहेत त्यांच्याप्रती त्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते.

पण, नेमके शब्द सुचत नसतात. गुरुजन किंवा दिवंगत आई वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काहीतरी करावे असे त्याला वाटत असते.

ज्यांना अपत्य नसते त्यांना आपल्या साहचर्याची / सहचारिणीची आपल्या नंतर कसे होईल ह्याची काळजी भेडसावत असते.

ज्यांना अपत्य लाभली आहेत त्यांना आपल्या उर्वरित आयुष्यात आपली मुले काय प्रकारची ट्रीटमेंट देतील ह्याचेही टेन्शन असावे.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर उर्वरित आयुष्य कसे घालवायचे ? ह्याचेही टेन्शन येत असावे.

तर व्यवसायात असणाऱ्यांना अजून किती वर्ष व्यवसायात राहायचे? ह्याचाही विचार मनात येत असतो.

तर काहींना आपल्याला आवडीच्या पण न जोपासता आलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या असतात पण ह्या वयात असे केल्यास समाज काय म्हणेल ह्याचीही विवंचना असते.

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेली आयुष्यभर मेहनत करून जमवलेली पुंजी आपल्या आणि आपल्या पत्नीच्या उर्वरित आयुष्या करता पुरेशी आहे किंवा नाही ? ह्याचेही टेन्शन.

तर मित्रांनो मी ह्या सर्व बाबींवर बऱ्या पैकी विचार करून माझे विचार मांडतो.

(1) सर्वात महत्वाचे म्हणजे साठी ओलांडल्या नंतर आपल्या सर्वांनाच आपले मृत्युपत्र करून ते सरकार दरबारी नोंदणी करून ठेवणे सध्य स्थितीत अत्यंत आवश्यक आहे. आज आपल्या शहरात आपली राहती सोसायटी मधील सदनिकेची किंमत करोडोंच्या पुढे गेलेली आहे. आपल्या वारसांना आपणास क्लियर टायटल द्यायचे असेल तर नुसते सोसायटीमध्ये नॉमिनेशन करून चालणार नाही किंवा माझी मुले गुणी आहेत ती आपापसात भांडणार नाहीत अशा भ्रमात राहूनही चालणार नाही.आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे अगदी साधे सरळ व सोप्प्या भाषेत आणि कुठलीही एम्बिग्युटी नसलेले मृत्युपत्र करणे हि काळाची गरज आहे असे मला वाटते.

(२) मेडिकल सायन्स प्रगत असल्यामुळे आपले आयुष्यमान नक्कीच वाढलेले आहे. त्यामुळे मी साठ वर्षाचा झालो म्हणून गर्भगळीत न होता आपली तब्येत जपून शक्यतेव्हडे कार्यरत राहणे हे आपल्या हिताचे आहे हे हि विसरून चालणार नाही. कार्यरत असलेल्या माणसाचा नेहमीच मान आणि इज्जत राहते हे विसरून चालणार नाही.

(३)प्रेम दिल्याने प्रेम मिळते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच रिस्पेक्ट इज आल्वेज  रेसिप्रोकाल . रिस्पेकट इज कमांडेड अँड नॉट डिमाण्डेड… हे ही विसरून चालणार नाही. तसेच दुसऱ्यांकडून कमीतकमी अपेक्षा ठेवण्याची सक्त निकड असते हे ही विसरता येणार नाही.

(४) अतिशय महत्वाचे म्हणजे आपण सर्वजण साठ वर्ष दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना घाबरून आणि समाजाची पर्वा करत जगत आलो. उर्वरित आयुष्य स्वतःसाठी आपल्या आवडती / आवडत्या करता जगूया. वेळ पडली तर जगाला आणि समाजाला फाट्यावर मारून.

(५) आपण आयुष्यात कमावलेले पैसे आपल्यासाठी आणि आपल्या पत्नी / पती साठीच आहेत. उरतील ते बाकीच्यांसाठी त्यामुळे स्वतःवर किंवा जोडीदारावर खर्च करतांना विल मध्ये देण्यासाठी काय राहील ह्याचा अजिबात विचार करण्याची गरज नाही.

(६) रिटायरमेंटचे जो प्लॅनिंग करतो तो लौकर वरती जातो.

सो नो प्लॅनिंग .

ओन्ली एन्जॉयमेंट.

हाहाहा. पटतंय ना?

 

26

Sharing

About The Author: Shriram Garde

My mission is just to share the events in my life sincerely with you; as I have experienced them, not necessarily in that order. I write on various topics. Whether that means - advice, tips, tools, scriptures, or instructions on budgeting, getting out of debt, making some extra cash, investing or anything else, I intend to provide it. I was 18 years old when I started working as a labourer. I had no savings. I had no money left in my bank accounts. I know life through lot of unpleasant incidences occurring day in and day out. But what I realised is that it doesn't have to be always like that. We are not doomed to how we are currently living – we all can change! I know, because over last couple of years my family and me have paid off a huge amount of debt. I have a passion to help people come to this realisation and get started on their own journey to financial freedom. I had owned 2 Companies before moving to Finance Sector about 9 years back. Spending more than 30 years in various capacities taught me quite a lot. I have a diploma in Engineering completed in part time while I was working. I have learned a good chunk from my working background in various fields. But, like most people who are eager to learn, the bulk of what I have learned thus far is from reading magazines, books, blogs, pod cast or whatever else I can get my hands on about Personal Finance, investing, business, personal development, and time management.

Leave your comment