सन १९४२…प्रसंग, बातम्या आणि बातम्यावाले ….आजचे

सन १९४२…प्रसंग, बातम्या आणि बातम्यावाले ….आजचे

समजा १९४२ साली  चले जाव  आंदोलनावेळी  कोणत्याही गोष्टीचे  घाणेरडे राजकारण करणारी मंडळी असती अथवा भडक बातम्या देणारी माध्यमे किंवा हमसून हमसून विचार करणारी मंडळी असती तर काय बातम्या असत्या?
१. गांधींनी जनतेस चिथावले ‘ करो या मरो’, जनजीवन विस्कळीत
२. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल
३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून!
४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला
५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले
६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय
७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, ‘आज चूल कशी पेटणार?’
८. इंग्रज सोडून गेल्यावर त्यांचे आर्दर्ली कुटुंबाचे पोट कसे भरणार? गांधींनी इंग्रजांना ‘चले जाव’ म्हणण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे-
९. आम्हालाही स्वातंत्र्य हवे आहे, पण सामान्य नागरिकांना वेठीस धरून मिळणार असेल तर अशा आंदोलनास आमचा विरोध राहील! –
१०. गांधीनी आताच का ‘करो या मरो’ ची घोषणा दिली? टायमिंग संशयास्पद! What’s the deal, Mahatma?- ट्विटरविंद बवाल
११. ‘ह्या ज्या स्वस्त धान्य दुकानसमोर जी ही रांग लागली आहे, त्यामुळे हे जे रांगेत उभे असणारे हे जे लोक आहेत, हे त्रस्त झाले आहेत. हे जे आंदोलन आहे, त्यामुळे हा जो त्रास होतोय, तो फक्त आम आदमीलाच होत असून, ‘कुठे आहेत ह्या आंदोलनामुळे घाबरलेले इंग्रज अधिकारी’, असा हा प्रश्न जो आहे, तो जे हे गांधी आहेत, त्यांना हा इथे विचारावा वाटतो” – घी 12 तास चॅनेलचा वार्ताहर
१२. ‘ स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांना लक्ष्य करण्याऐवजी भारत बंद ची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य आहे का?’ – ज. गा. वेगळे
१३. ” इंग्रज अधिकारी आपल्या बंगल्यात बसून ऍपल पाय खात दार्जिलिंग टी चे घोट निवांतपणे घेत असताना गोरगरीब जनता मात्र गांधींच्या आंदोलनापायी भरडली जात आहे. ही गांधींची हुकूमशाही आहे. ” – युवा नेते
१४. ” ही तर गांधींची मुस्लिम लीगच्या वेगळ्या पाकिस्तानच्या मुद्द्यापासून जनतेचे लक्ष भरकटवण्याची युक्ती! ” – सुश्री नेत्या
१५. ” Gandhiji, Target British Officers, not the common man.” -ट्विटराणा
१६. ” Is independence the only solution for India’s problem? Mr. Mahatma, There are more important issues to solve!” – ट्विटरिका
19

Sharing

About The Author: Shriram Garde

My mission is just to share the events in my life sincerely with you; as I have experienced them, not necessarily in that order. I write on various topics. Whether that means - advice, tips, tools, scriptures, or instructions on budgeting, getting out of debt, making some extra cash, investing or anything else, I intend to provide it. I was 18 years old when I started working as a labourer. I had no savings. I had no money left in my bank accounts. I know life through lot of unpleasant incidences occurring day in and day out. But what I realised is that it doesn't have to be always like that. We are not doomed to how we are currently living – we all can change! I know, because over last couple of years my family and me have paid off a huge amount of debt. I have a passion to help people come to this realisation and get started on their own journey to financial freedom. I had owned 2 Companies before moving to Finance Sector about 9 years back. Spending more than 30 years in various capacities taught me quite a lot. I have a diploma in Engineering completed in part time while I was working. I have learned a good chunk from my working background in various fields. But, like most people who are eager to learn, the bulk of what I have learned thus far is from reading magazines, books, blogs, pod cast or whatever else I can get my hands on about Personal Finance, investing, business, personal development, and time management.

Leave your comment